मुंबई | करोणाची लस आता सरकारी रुग्णालयासहित खासगी रुग्णालयांमध्येही उपलब्ध होणार आहे. सरकारी रुग्णालयात पूर्णपणे मोफत असलेली ही लस, खाजगी रुग्णालयामध्ये 250 रुपयांना देण्यात येईल. राज्याचे आरोग्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
खाजगी रुग्णालयांमध्ये ही लस लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यांच्या डॉक्टरांना आणि नर्सिंग स्टाफला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. को – विन 2.0 या करोना संबंधित ऑनलाइन बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. नॅशनल हेल्थ अथॉरिटी आणि केंद्रीय आरोग्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक 26 फेब्रुवारी रोजी पार पडली होती.
बैठकीतील हा निर्णय नवीन नियमावली लागू होईपर्यंत अमलात आणला जाईल. अतिरिक्त सचिव वंदना गुरनानी यांनी म्हटले की, ‘राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश यांना आपापल्या क्षेत्रातील खासगी रुग्णालयात या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यावे लागेल. आणि त्यांना या लसीची किंमत आणि ती देण्याच्या पद्धतीसाठी प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षणाकरिता प्रोत्साहित करावे लागेल.