हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मागील महिनाभरापासून जगात दहशत माजवलेल्या कोरोना विषाणूने सर्वांनाच हादरवून सोडलं असून कोरोनो व्हायरसमुळे चीनमधील मृतांचा आकडा १० तारखेपर्यंत एक हजारांच्या वर गेला आहे. चीनमध्ये ठराविक काळाच्या अंतरात एखाद्या आजाराने लोकांचा बळी जाण्याचा हा दुर्दैवी विक्रम असून यामुळेच चीनमधील आरोग्यव्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.
विमानतळावर या आजाराची लागण होऊ नये म्हणून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. दहा फेब्रुवारीपर्यंत २४७८ नवीन केस नोंद झाल्या असून ९ तारखेला एकाच दिवशी १०८ मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी चीनच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने दिली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार चीनमधून हा आजार बाहेर गेला तर तो अधिक पसरु शकतो, आणि याचे गंभीर परिणामही होऊ शकतात. आतापर्यंत २४ देशांतील ३२४ रुग्णांना याची लागण झाली असून त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरु आहेत. थायलंड आणि फिलीपाईन्समध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.