कोरोनाचा उद्रेक ; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात लॉकडाउनची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढले असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, करोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने नागपूर शहरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. नागपूर शहरात १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

नागपुरातच नाही तर ग्रामीण भागात सुद्धा रुग्ण आढळून येत आहेत. शनिवार-रविवार बंदला म्हणजे मिनी लॉकडाऊनला प्रतिसाद मिळाला नाही. बाधित रुग्ण बाहेर पडत असल्याची माहिती आहे. त्यामुळे लॉकडाऊन करावा लागत आहे”, असं नितीन राऊत यांनी सांगितलं. दरम्यान नागपूर मध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहील.लसीकरण चालू राहील तसेच डोळ्यांचे दवाखाने आणि चष्म्याचं दुकान सुरू राहील, असं नितीन राऊत म्हणाले.

नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1710 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तरीही अनेक बेजबाबदार लोक मास्क घालायला तयार नाही. नागपूरच्या कॅाटन मार्केट परिसरात निम्मे लोक सर्रास विनामास्क वावरतात. त्याचा परिणाम म्हणून नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment