हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट चाहते क्रिकेटचं महाकुंभ मानल्या जाणाऱ्या आयपीएल स्पर्धेची उत्सुकतेनं पाहत असतात. मात्र, यंदाच्या हंगामात क्रिकेट चाहत्यांच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता आहे. येत्या २९ मार्चपासून आयपीएएलच्या १३व्या हंगामाला सुरूवात होणार आहे. परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. चीननंतर अनेक देशांना कोरोना व्हायरस ने विळखा घातल्यानंतर ऑलम्पिक बरोबरच नेक महत्त्वाच्या स्पर्धा रद्द करण्याच्या मार्गावर आहेत तर काही रद्द कराव्या लागल्या आहेत.
आयपीएल स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळांडूंपासून तर आयोजकांपर्यंत अनेक विदेशी खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत असतात.मात्र पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच ही स्पर्धा घेण्याचे संयोजकांनी ठरवले आहे.आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या एकाही परदेशी खेळाडूने भारतात प्रवास करण्याविषयी आक्षेप घेतलेला नाही. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमधील जवळपास ६० खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार असून या देशांमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. करोनापासून सावधगिरी बाळगण्यासाठी सरकारनं गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचंही आवाहन सर्वांना केलं आहे. करोनामुळे आयपीएस स्पर्धा पुढे ढकलण्याची शक्यता आहे.
करोनामुळे जगभरात ३५०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले असून भारतातील करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागल्याने लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशात आता ही स्पर्धा पुढे ढकलण्यावर विचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यावर विचार सुरू असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. “अनेक मोठे कार्यक्रम रद्द होत आहेत. गर्दीच्या ठिकाणी अशा आजारांचा प्रसार होण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धा नंतर घेतली तरी चालू शकते. खबरदारीचा उपाय म्हणून आयपीएस स्पर्धा पुढे ढकलण्याचा विचार आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.