हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ओमायक्रोन च्या रूपाने कोरोनाची तिसरी लाट आली असून दररोज अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. दरम्यान, कोरोनाची तिसरी लाट कधी संपणार असा प्रश्न सर्वाना पडला असतानाच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत उत्तर देत मार्च महिन्याच्या मध्यावधीपर्यंत कोरोनाची तिसरी लाट संपुष्टात येऊ शकते, असं तज्ज्ञांनी सांगितले असल्याचे राजेश टोपे म्हणाले.
करोनाची तिसरी लाट ही मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत संपुष्टात येईल, अशी माहिती तज्ज्ञांनी दिल्याचं टोपे म्हणाले. न्यूकॉन हा नवा व्हेरीएंट चीन मधून आला आहे. याबाबतची जागतिक आरोग्य संघटनाकडून अद्याप माहिती नाही. मात्र, या नव्या विषाणूमध्ये मृत्यूदर अधिक असल्याचे सांगितले जाते. पण, सध्या या नव्या विषाणूचा कुठलाही रूग्ण आपल्या देशात नाही. त्यामुळे सध्या कुठलीही चिंता नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यात मास्कमुक्ती करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.मास्कमुक्त महाराष्ट्र असं आम्ही कधीही म्हटलेलो नाही. इंग्लंड, डेन्मार्क, हॉलंड अशा युरोपातल्या देशांमध्ये काही निर्णय घेतले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्याला त्यातून काही बोध घेता येईल का? आपल्याकडील नियमांबाबत काही बदल करता येतील का? याविषयी आयसीएमआरकडे विचारणा करण्याची विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना केली”, असं स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिलं होतं.