सांगली । राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात कोरोनासह ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असले शुक्रवारी जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला. सांगली शहरात आळढलेल्या दोन्ही रुग्ण ओमायक्रॉन कोरोनामुक्त झाले. तर मिरज मेडिकल कॉलेजमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या तब्बल 92 विद्यार्थ्यांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात नव्याने 75 जण पॉझिटिव्ह आढळून आले. अॅक्टीव्ह रुग्णसंख्येने चारशेचा आकडा ओलांडला. सांगली, मिरज महानगरपालिका क्षेत्र हॉटस्पॉट बनत असून तेथे 43 रुग्ण आढळून आले.
उर्वरित जिल्ह्यात 32 रुग्ण आढळले. कोरोनाची साथ अद्याप संपलेली नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. सांगली शहरातील दोन व्यक्ती ओमायक्रॉन बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे जिल्ह्यासाठी धोक्याचा इशारा समजला गेल्याने धास्ती निर्माण निर्माण झाली होती. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी घेतल्यानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले नव्हते. ओमायक्रॉन बाधित व्यक्ती किरकोळ त्रास असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. तब्ब्येत उत्तम झाल्यानंतर त्यांची पुन्हा चाचणी घेण्यात आली, दोन्ही रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे सांगली शहरात आळढलेल्या दोन्ही रुग्ण ओमायक्रॉन कोरोनामुक्त झाले.
जिल्ह्यात चोवीस तासात नव्याने 72 रुग्ण आढळून आले. मंगळवारी आढळलेली रुग्णसंख्या काहीसी कमी झाली. मात्र रुग्णसंख्येत विशेष घट दिसून येत नाही. कोरोना संयशित असलेल्या रुग्णांच्या आरटीपीसीआर चाचण्या 1040 पैकी 24 बाधित तर 1152 अँन्टीजेन चाचणीमध्ये 56 जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. महापालिका क्षेत्रात झपाट्याने रुग्ण वाढत असून हॉटस्पॉट बनत आहे. सांगली शहर 28, मिरज शहरात 15 रुग्ण आढळले.