हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिका मधून जगभर पसरलेल्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्ट ने भारतात देखील हातपाय पसरले असून आत्तापर्यंत देशात 400 पेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग रोखता येणार नसून देशात जानेवारी महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
दिल्लीत मागील चोवीस तासात 249 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीत झालेली ही रुग्णवाढ देशातील इतर राज्यांसाठीही डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आत्ताची रुग्णवाढ पाहता नव्या वर्षात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तिसरी लाट येऊ शकते आणि स्थिती आणखी बिघडू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोरोनाची तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेप्रमाणे गंभीर आजारी रुग्णांची नसेल. परंतु, आपण आधीच सतर्क राहण्याची आवश्यकता आहे . दरम्यान, भारतात आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे एकूण 415 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 115 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.