हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाउन लागू आहे. हा लॉकडाउन पाळला जावा म्हणून राज्यातील पोलीस जीव धोक्यात घालून दिवसरात्र रस्त्यावर पहारा देत आहे. दरम्यान, मुंबईच्या अनेक भागात कोरोना फैलावत असताना मुंबई पोलिसांवरील ताण वाढतो आहे. मात्र अशाही परिस्थिती आपल्या कर्तव्याची जाणीव ठेऊन ते रस्त्यावर आपली जबाबदारी पार पडत आहेत. अशा मुंबई पोलिसांचे बॉलीवूडच्या सिंघम म्हणजेच अजय देवगणने कौतुक करत पोलिसांसोबत रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली आहे. अजय देवगणने तसं ट्विटच केलं आहे.
अजय देवगणने ट्विट करत म्हटलं आहे की, ”प्रिय मुंबई पोलीस…तुम्ही जगातील सर्वोत्तम पोलीस असणाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जाता. करोनाशी लढा देताना तुम्ही दिलेलं योगदान अतुलनीय आहे. तुम्ही जेव्हा कधी सांगाल तेव्हा हा सिंघम खाकी घालून तुमच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरण्यास तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र”.अजय देवगनच्या या ट्विटमुळे मुंबई पोलिसांचा उत्साह वाढला आहे.
Dear Mumbai Police, you are known as one of the BEST in the world. Your contribution to the COVID-19 pandemic is unparalleled. Singham will wear his Khakee and stand beside you whenever you ask. Jai Hind, Jai Maharashtra ????@CPMumbaiPolice @MumbaiPolice
— Ajay Devgn (@ajaydevgn) April 9, 2020
दरम्यान, राज्यातील काही भागांमध्ये पोलिसांवर हल्ले होत असल्याचे दिसत आहे. नागरिकांच्या रक्षणासाठी कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण होणे हि लज्जास्पद बाब आहे. आज औरंगाबाद शहरात एका पोलीस कर्मचाऱ्याला काठीने बेदम मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यापार्श्वभूमीवर अजय देवगांचे हे ट्विट नक्कीच आशादायक आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.
इतर महत्वाच्या बातम्या –
कोरोनाच्या संकटात आता ‘सारी’ने चिंता वाढवली; औरंगाबादमध्ये १० जणांचा बळी #CoronaWarriors #Covid_19india #CoronaInMaharashtra #HelloMaharashtra https://t.co/PDJlAvdfUC
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 9, 2020
कोरोना आणि व्हायरस नावाची भानगड नक्की काय आहे ?@PawarSpeaks @rajeshtope11 @CMOMaharashtra @VarshaEGaikwad @RRPSpeaks @RohitPawarOffic #HelloMaharashtra #CoronaInMaharashtra #CoronaWarriors https://t.co/1nwSdQC4jA
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 9, 2020
१५ एप्रिलपासून पुन्हा सुरु होऊ शकते रेल्वे, ४ तास अगोदर पोहोचावे लागणार स्टेशनवर#CoronaInMaharashtra #CoronaUpdatesInIndia #covidindia #COVID #HelloMaharashtra https://t.co/W8e07oQNrR
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 9, 2020
https://twitter.com/HelloMaharashtr/status/1248162667639889922https://twitter.com/HelloMaharashtr/status/1248161070117601281
https://twitter.com/HelloMaharashtr/status/1248162667639889922https://twitter.com/HelloMaharashtr/status/1248161070117601281