मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन लागू आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने वारंवार सांगूनही काही लोक घराबाहेर पडून गर्दी करताना दिसत आहेत. ताज उदाहरण म्हणजे पंतप्रधानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारीच्या दिवे लावा कार्यक्रमाचा काही जणांनी रस्त्यावर येऊन मिरवणूक काढून फज्जा उडवला. त्यामुळं येत्या हनुमान जयंतीला तसंच शब्ब-ए-बारातला घराबाहेर पडू नका असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवाहन राज्यातील जनतेला केलं आहे.
लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानानं औषधी झाडासह संपूर्ण पर्वत उचलून आणल्याचं वर्णन रामायणात आहे. आज जनतेला करोनापासून वाचवण्यासाठी हनुमानासारखे पर्वत उचलण्याची नाही तर घरातच थांबण्याची गरज आहे,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. मुस्लीम बांधवांनीही शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, घरातंच थांबावं असंही त्यांनी म्हटलं आहे. करोना संसर्गाची साखळी तोडणं आणि नागरिकांचा जीव वाचवणं हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशातील प्रत्येक व्यक्तीचं आज एकमेव कर्तव्यं आहे. त्यासाठी घराबाहेर न पडणं, बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात न येणं, करोनाला प्रसाराची संधी न देणं आणि करोनाची साखळी तोडणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पुढील सूचना येईपर्यंत सण, उत्सव, पूजा, अर्चा, यात्रा, जत्रा, प्रार्थना, धार्मिक कार्ये ही घरातंच करावीत, कुणीही घराबाहेर पडू नये,” असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.
करोनाच्या रुग्णसंख्येत दररोज शेकड्यांनी वाढ होत आहे. ही वाढ चिंताजनक आहे. नागरिकांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वर्तन ठेवलं पाहिजे. शासनाने राज्यातील काही भाग सीलबंद करण्याचे निर्णय घेतले आहेत. बंदी आदेश जारी केले आहेत. आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकलं जाईल. करोनाच्या संदर्भात शासन यापुढे अधिक धोका पत्करणार नाही. कोरोनाप्रसारास कारणीभूत ठरणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल होतील आणि त्यांना परिणाम भोगावे लागतील असा इशाराही अजित पवारांनी दिला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
राज्यात आज २३ नवे करोनाग्रस्त, राज्यातील आकडा पोहोचला ८९१ वर
१४ एप्रिलनंतर लॉकडाउन हटणार, असं कुणीही गृहित धरू नये- राजेश टोपे
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?
आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी मास्क घालून स्वतःच चालवली गाडी
मिस इंग्लंडचा मुकुट उतरवून ‘ही’ भारतीय सुंदरी बनली डाॅक्टर