केंद्र सरकारनं मास्क, सॅनिटायजरच्या किंमती केल्या निश्चित; काळेबाजारामुळं घेतला निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. महाराष्ट्रात सध्या ६० हून अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. करोनापासून बचाव व्हावा म्हणून मास्क आणि हँड सॅनिटायजर विकत घेण्यासाठी मेडीकल दुकानांवर नागरिक गर्दी करत आहेत. अशा परिस्थितीत राज्यात अनेक ठिकाणी दुकानदार मास्क आणि सॅनिटायजरचा काळाबाजर करत असल्याचं समोर आलं होतं. हा प्रकार थांबवण्यासाठी केंद्रानं या वस्तूंच्या किंमती निश्चित केल्या आहेत.

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी, ट्विटर अकाऊंटवरुन, मास्क आणि सॅनिटायजरच्या किमती केंद्र सरकारने निश्चित केल्याचं सांगितलं आहे. ज्यामध्ये मास्कसाठी ८ ते १० रुपये आणि सॅनिटायजरच्या २०० मि.ली बाटलीची किंमत ही १०० रुपये असेल असं पासवान यांनी जाहीर केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काही दिवसांपूर्वी देशवासियांना संबोधित करत खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. याचसोबत कोरोनापासून बचावासाठी नागरिकांनी स्वच्छतेचे महत्व पटवून देत त्यांना घरीच राहण्याचं आवाहन अनेक बॉलीवूड सेलेब्रिटी, खेळाडूंनी केलं आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

 

Leave a Comment