हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संसर्गा संबंधी एक महत्वाची बाब समोर आली आहे. माध्यम वयोगटांनंतर आता २१ ते ३० वयोगटाला कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचं आढळलं आहे. राज्यामध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांपैकी ४४ रुग्ण २१ ते ३० वयोगटातील आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या अहवालामध्ये ही माहिती स्पष्ट केली आहे. तेव्हा तरुणांना जर असं वाटतं असेल कि, कोरोना केवळ वयोवृद्धांना होते तर तो त्यांचा गैरसमज आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालानुसार, कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका २१ ते ३० वयोगटाला आहे. अहवालात नोंद केलेल्या २०३ रुग्णांपैकी ४४ तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. ३१ ते ४० वयोगटातील ४३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ४१ ते ५० वयोगटातील ३८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अहवालात नोंदवलेल्या आकडेवारीनुसार ६४ टक्के पुरुष तर ३६ टक्के स्त्रियांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचं म्हटलं गेलं आहे.
या अहवालातील माहिती तरुणांसाठी धोक्याची घंटा आहे. कारण या अहवालानुसार नोंद झालेल्या रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण हे तरुण वयोगटातील आहेत. तेव्हा जर कोणाला वाटतं असेल कि आपण एकदम मजबूत तब्बेतीचे आहोत आणि आपल्याला कोरोना शिवणार सुद्धा नाही त्यांनी या अहवालातून योग्य तो धडा घेण्याची गरज आहे. तसेच गरज नसताना घराबाहेर जाणं टाळलं पाहिजे. योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे कारण कोरोना वय बघून होत नाही. coronavirus-highest-threat-to-the-young-class
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 79726 30753 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.