कोरोनाचा अमेरिकेला आणखी एक जबरदस्त हादरा! गेल्या २४ तासांत ३१७६ जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । कोरोनाच्या संसर्गाने अमेरिकेत थैमान घातले आहे. अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असून मृतांची संख्या ५० हजाराजवळ पोहचली आहे. न्यूयॉर्कमध्ये सर्वाधिक करोनाबाधित असून २० हजार जणांचा मृत्यू झाल आहे. मागील २४ तासांत अमेरिकेत कोरोनाच्या संसर्गामुळे ३ हजार १७६ जणांनी प्राण गमावले आहेत. अमेरिकेत शुक्रवारी सकाळपर्यंत एकूण ८ लाख ६७ हजार ४५९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, ४९ हजार ८०४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अमेरिकेत आतापर्यंत ४६ लाख जणांची कोरोना टेस्ट झाली आहे.

अमेरिकेत सुरू असलेले कोरोनाचे थैमान थांबण्याची कोणतीच चिन्ह दिसत नसून दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या यांच्यात वाढ होत चालली आहे. न्यूयॉर्क राज्यात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. न्यूयॉर्कमध्ये २ लाख ६० हजारांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली असून २० हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. न्यूजर्सीमध्येही एक लाख नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. तर, ५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

बऱ्याच देशांनी कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी लॉकडाउन जाहीर केला आहे. तर, अमेरिकेत पूर्णपणे लॉकडाउन जाहीर करण्यात आला नाही. मात्र, नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जगातील जवळपास २१० देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. जगभरात २७ लाख नागरिकांना करोनाची बाधा झाली असून मृत्यूची संख्या १ लाख ८० हजारांहून अधिक झाली आहे.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews.

Leave a Comment