इटलीमध्ये मृतांचा आकडा १० हजारांवर; तर युरोपात ३ लाख लोकांना संसर्ग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात जीवघेणा करोना व्हायरस हैदोस घालत आहे. जगभरातील १७० पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जगात चीनपेक्षाही जास्त बळी इटलीमध्ये गेले असून तेथे करोना विषाणूने थैमान घातले आहे. इटलीमध्ये शनिवारी करोनामुळे ८८९ जणांचा मृत्यू झाला. याचबरोबर इटलीमधील मृतांची एकूण संख्या १० हजार २३ झाली आहे. तर करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ९२ हजार ४७२ आहे. इटलीमधील लॅम्बार्डी प्रांताला करोनाचा सर्वाधिक फटका बसला असून शनिवारी तेथे ५४२ जणांचा मृत्यू झाल्याचे रॉयटर्सने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. लॅम्बार्डीमध्ये करोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या पाच हजार ९४४ इतकी झाली आहे. म्हणजेच इटलीत एकूण मरण पावलेल्यांपैकी अर्ध्याहून अधिक मृत्यू हे लॅम्बार्डीमध्ये झाले आहेत.

युरोपात इटली खालोखाल करोनाची सर्वात जास्त झळ स्पेनला बसली आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत ५ हजार ९९२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण संसर्ग झालेल्यांचा आकडा ७३ हजार २३५ वर पोहोचला आहे. इटली, स्पेनबरोबरच फ्रान्स, ब्रिटन या युरोपीयन देशांमध्येही करोनाचा कहर दिसून येत आहे. युरोपात ३ लाख लोकांना संसर्ग झाला असून करोना व्हायरस आटोक्यात येण्याची कुठलीही चिन्हे नाहीत.

फ्रान्समध्ये शनिवारी करोना व्हायरसमुळे ३१९ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर देशात महामारीमुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा २ हजार ३१४ वर पोहोचला आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत करोनाचा ३७ हजार ५७५ लोकांना संसर्ग झाला आहे. १७ हजार ६२० लोक रुग्णालयांमध्ये दाखल आहेत.

ब्रिटनमध्ये मागील २४ तासांमध्ये करोना व्हायरसमुळे २६० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर देशात करोनामुळे जीव गमावलेल्यांची संख्या १ हजारावर पोहोचला आहे. तर करोना बाधितांचा आकडा वाढला असून १७ हजार ८९ वर पोहोचला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

महाराष्ट्रात आढळले ७ नवे करोनाबाधित;संख्या १९३वर

भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?

भयावह! इटलीत २४ तासांत कोरोनाने घेतला ९००हून अधिक जणांचा बळी

बेजबाबदारपणाचा कळस; IAS अधिकारीचं होम क्वारंटाइनमधून पळाला

भारतात ‘या’ ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन

Leave a Comment