नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळं देशाच्या विविध भागात अडकलेल्या नागरिकांना आणि स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी अतिरिक्त रेल्वेने मंगळवारी मोठी घोषणा केली होती. यानुसार २३० अतिरिक्त ट्रेन चालवण्यात येणार आहेत. या रेल्वे गाड्यांमध्ये एसी, स्लीपर आणि जनरल डबेही असतील. या ट्रेन रोज धावतील.
दरम्यान, रेल्वेने १ जूनपासून सुरू होणाऱ्या २०० अतिरिक्त ट्रेनसाठी बुकींग सुरू केले आहे. काही रेल्वे स्टेशन आणि ऑनलाइनवरूनही प्रवाशांना बुकींग करता येणार आहे. रेल्वेने २१ मेपासून म्हणजे कालपासून हे बुकींग सुरू झाले. यासाठी २३० ट्रेनसाठी गेल्या २४ तासांत १३ लाख तिकीटांचे बुकींग झाले, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
देशातील विविध स्टेशनवरून सुटणाऱ्या २३० ट्रेनसाठी सर्व प्रकारच्या श्रेणींचे बुकींग आजपासून सुरू झाले. IRCTCच्या वेबसाइटवरून प्रवाशांना ऑनलाइन बुकींग करता येणार आहे. तसंच रेल्वेच्या आरक्षण काउंटरवर जाऊनही तिकीट काढता येणार आहे. याचा शेकडो लाभ प्रवाशांनी घेतला असून आतापर्यंत १३ लाख तिकीटांचे बुकींग झाले आहे. रेल्वेने गुरुवारी बुकींग सुरू केल्यावर तासाभरातच १.५ लाख तिकीटांचे बुकींग झाले होते. तर चार तासांत ४ लाख तिकीट बुक झाले होते.
दरम्यान, भारतीय रेल्वेने प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुकिंगसोबत आता रेल्वे तिकीट काऊंटर आणि एजंट द्वारेही बुकिंग करता येणार आहे. याव्यतिरिक्त, कॉमन सर्व्हिस सेंटरला ही रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”