हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या ७ ते ८ दिवसांचा रक्तसाठा शिल्लक आहे. येणाऱ्या काळात आपल्याला मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज लागू शकते. त्यामुळं रक्तदात्यांनी पुढं यावं आणि प्रशासनानंही रक्तदान शिबिरासाठी पूर्ण सहकार्य करावं,’ असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केलं. करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील रक्तसाठ्याची वस्तुस्थिती सांगत सामाजिक संस्थांना रक्तदान शिबिरं घेण्याबरोबरच, नागरिकांना रक्तदानाचे आवाहन केलं.
चला तर पाहुयात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नेमकं काय आवाहन केलं ते..
https://www.facebook.com/RajeshTopeOfficial/videos/3334394746576040/