मुंबई | राज्यातील कोरोना रुग्नांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. सध्या राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८९ वर पोहोचला आहे. काल संध्याकाळपासून एकुण १५ कोरोना रुग्ण राज्यात सापडले आहे. देशात आत्तापर्यंत ३९१ कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर देशात एकुण ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्नांच्या संख्येतही वेगाने वाढ होत आहे. नवीन रुग्नांपैकी १० रुग्न मुंबईचे आहेत तर पुण्यात १ नवीन रुग्न सापडला आहे.
राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत सापडले आहेत. सध्या मुंबईत एकुण ३८ कोरोना रुग्ण आहेत. त्यातील २ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पुण्यातील कोरोना रुग्णांचा आकडा १६ वर पोहोचला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये १२ रुग्ण आहेत. नागपूर, यवतमाळ, कल्याण, नवी मुंबई येथे प्रत्तेकी ४ कोरोना रुग्ण साोडलेत. अहमदनगर येथे २ कोरोना रुग्ण आहेत. पनवेल, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी येथे प्रत्तेकी १ रुग्ण आहे.
राज्यात कोरोनाचे ८९ रुग्ण, कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा#HelloMaharashtra #COVIDIOTS #COVIDー19 #COVID19outbreak #Coronavirusmaharashtra #IndiaFightsCoronavirus @rajeshtope11 @OfficeofUT pic.twitter.com/ZYfAxpHW1u
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) March 23, 2020
दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी जमावबंदीचे आदेश दिलेले असतानादेखील नागरिक घरातून बाहेर पडलेले दिसत आहेत. पुणे, मुंबई या शहरात नागरिकांनी रस्त्यांवर वाहनांची गर्दी केली आहे. यापार्श्वभुमीवर आता नागरिकांना अधिक काळजी घेणे गरजेचे झाले आहे. तेव्हा घरातून बाहेर पडू नका असे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे.
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
स्वत:ला वाचवा, स्वत:च्या कुटुंबाला वाचवा! – पंतप्रधान मोदी
मुंबईसाठी धोक्याची घंटा! १२ तासात सापडले कोरोनाचे १० नवीन रुग्ण
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८९ वर, काल संध्याकाळ पासून १५ रुग्न वाढले
महाराष्ट्र ‘लॉकडाऊन’ करणाऱ्या कलम १४४ मध्ये नक्की असं आहे तरी काय? घ्या जाणून
अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश
धक्कादायक..!! औरंगाबादमध्ये जनता कर्फ्युदिनीच पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचं शाही लग्न