लष्कर प्रमुखांनी पाकिस्तानला घेतलं फैलावर म्हणाले, जग करोनाशी लढतंय अन् तुम्ही..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । भारताचे लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. सीमारेषेवरील परिस्थितीचा ते आढावा घेत आहे. यावेळी एएनआयशी बोलताना त्यांनी पाकिस्तानला चांगलंच फैलावर घेतलं. ”कोरोनाच्या संकटात आम्ही आमच्या लोकांची मदत करण्यात व्यस्त आहोत. फक्त आमच्या लोकांचीच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये वैद्यकीय मदत आणि औषधांचा पुरवठा करत मदतीचा हात देत आहोत. पण दुसरीकडे पाकिस्तान मात्र फक्त दहशतवाद निर्यात करत आहे. हे योग्य नाही,” असं लष्कर प्रमुखांनी म्हटलं आहे.

संपूर्ण जग आणि भारत आज कोरोनाशी लढा देत असताना आपला शेजारी देश अद्यापही आपल्याला त्रास देण्यात व्यस्त आहे ही दुर्दैवी बाब आहे अशा शब्दांत लष्कर प्रमुख नरवणे यांनी पाकिस्तानला दहशहतवादाच्या मुद्द्यावर सुनावलं. गेल्या काही दिवसात अनेकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं आहे. यापार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी भारताने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दुधनियाल परिसरातील दहशतवादी लाँचपॅडवर स्ट्राइक करत पाकिस्तानला चोख उत्तर दिलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

 

Leave a Comment