हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाचा चौथा बळी गेला आहे. कस्तुरबा रूग्णालयात दाखल असलेल्या एका ६५ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांना काल संध्याकाळपासून मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होत होता. दरम्यान आज या रुग्णाचा उपचार करत असताना मृत्यू झाला आहे.
Maharashtra: A 65-year-old Coronavirus patient from UAE passed away in Mumbai yesterday. He was admitted in Kasturba Hospital. https://t.co/PSz1nXNavV
— ANI (@ANI) March 24, 2020
देशभरात करोना व्हायरसचा संसर्ग जलद गतीने वाढत असून करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५०० पर्यंत पोहोचली आहे. महाराष्ट्रात करोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१ पर्यंत पोहोचली आहे. मुंबईतील आजच्या करोनाबाधित रुग्णाच्या मृत्युनंतर देशभरात बळींची संख्या आता १० झाली आहे. तर जगभरात या व्हायरसमुळे आतापर्यंत १६ हजारपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. जगभरात साडेतीन लाखापेक्षा जास्त करोना बाधित रुग्ण आहेत.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.