मुंबई । राज्यात मागील २४ तासात आजवरचे सर्वाधिक कोरोनारुग्ण वाढले आहेत. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५२१८ वर पोहोचली असून दिवसभरात तब्बल ५५२ नवे रुग्ण सापडले आहे. यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण पसरले असून येत्या काही दिवसांत मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ताज्या आकडेवारीनुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे ३४५१ कोरोनाबाधित आहेत. तर त्याखालोखाल पुणे मनपा क्षेत्रात ६४६ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ठाणे मनपा क्षेत्रात १५० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. वसई विरार मध्ये १११, नवी मुंबई ९४, कल्याण डोंबिवली ९३ अशी आकडेवारी आहे.
दरम्यान, आज दिवसभरत १५० जण कोरोनातू मुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच एकूण १९ ज्यांना आज कोरोनामुळे राज्यात आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत ७२२ जण कोरोनातून बरे झाले आहेत तर २५१ जणांचा यात बळी गेला आहे.
कोरोनाग्रस्तांची जिल्हानिहाय यादी पाहण्यासाठी खालील ट्विटवर क्लिक करा
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ५२१८ वर
#CoronaInMaharashtra #HelloMaharashtra pic.twitter.com/J9s8tFPOyQ— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 21, 2020
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ५२१८ वर
आज १५० जण बरे होऊन घरी गेले
आज ५५२ नवीन रुग्ण कोरोनाचे मिळाले
आज १९ कोरोनाबाधितांचा मृत्यू #CoronaInMaharashtra #HelloMaharashtra pic.twitter.com/Lf1Mn8LKxS— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 21, 2020