Wednesday, June 7, 2023

महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा! राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ६४ वरुन ७४ वर

मुंबई | पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी अाज देशभर जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. देशात कोरोनाने थैमान घातले असून देशातील कोरोनारुग्णांचा आकडा आता ३२७ वर पोहोचला आहे. राज्यातील कोरोना रुग्नांचा आकडा ६४ वरुन आता ७४ वर पोहोचला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. आज राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा ६४ वरुन थेट ७४ वर पोहोचला आहे. यामध्ये पुण्यात नवीन ४ कोरोना रुग्ण सापडले आहेत तर मुंबईत नवे ६ कोरोना रुग्न सापडले आहेत.

दरम्यान, कोरोनो विषाणूने सध्या जगभर थैमान घातले आहे. चीन च्या वुहान प्रांतातून सुरु झालेल्या कोरोनाने आता जगातील २ लाखांहून अधिक जणांना शिकार बनवले आहे. कोरोनाची चाचणी मोफत किंवा अगदी माफक दरात असावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे. रविवारी सरकारकडून जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. देशात सर्वत्र कडकडीत बंद पहायला मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

देशात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ! आकडा ३१४ वर

अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश

बॉलिवूडच्या या हॉट अभिनेत्रीने दिली थेट कोरोनाला धमकी, केला हा बोल्ड फोटो शेयर

धक्कादायक! ४ करोनाग्रस्त रुग्णांनी केला मुंबई-जबलपूर ट्रेन प्रवास

लढा कोरोनाशी : कोरोनाची भीती कमी करायला हे वाचलंच पाहिजे बरं का..!!

सोळा दिवसांच्या उपचारानंतर ‍१३ कोरोना रुग्ण झाले ठणठणीत, भारतीय डॉक्टरांची कोरोनावर मात