राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २०३ वर, दिवसभरात २२ नवे रुग्ण, तुमच्या जिल्ह्यात किती पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता २०३ वर पोहोचला आहे. आज दिवसभरात राज्यात एकूण २२ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये आज मुंबई, पुणे, नागपूर, बुलडाणा आणि अहमदनगर मध्ये आज पुन्हा रुग्ण सापडलेत.

मुंबई आणि ठाणे येथे एकूण ११७ कोरोना रुग्ण आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड येथे एकूण ३७ कोरोना बाधित आहेत. तर सांगलीत एकूण २५ कोरोनाबाधित सापडले आहेत. नागपुरातील कोरोनाग्रस्तांची संख्या १३ वर पोहोचलाय. यवतमाळ मध्ये ३, अहमदनगर मध्ये ३, सातारा २ आणि जळगावात १ कोरोना रुग्णांची नोंद झालीय. औरंगाबाद मध्ये १, रायगड १, कोल्हापूर १, सिंधुदुर्ग १, बुलडाणा १, रत्नागिरी १ असे मिळून एकूण संख्या २०३ वर गेली आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसांत कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढणार आहे. अनेकांच्या कोरोना चाचणी या काही दिवसात घेण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा कधी थांबणार? हा प्रश्न आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण ३४ कोरोना रुग्ण आजारातून ठणठणीत बरे झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून दिली आहे.

कोरोनानिहाय रुग्णांची जिल्हानिहाय यादी खालिलवरामाने –
मुंबई, ठाणे – ११७
पुणे, पिंपरी चिंचवड – ३७
सांगली – २५
नागपूर – १३
यवतमाळ – ३
अहमदनगर – ३
सातारा – २
जळगाव – १
औरंगाबाद – १
रायगड – १
कोल्हापूर – १
सिंधुदुर्ग – १
बुलडाणा – १
रत्नागिरी – १

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

जगातील पहिल्या कोरोनाग्रस्ताचा लागला शोध, कोण आहे ‘हा’ व्यक्ती? घ्या जाणून

भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?

भयावह! इटलीत २४ तासांत कोरोनाने घेतला ९००हून अधिक जणांचा बळी

बेजबाबदारपणाचा कळस; IAS अधिकारीचं होम क्वारंटाइनमधून पळाला

भारतात ‘या’ ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन

 

Leave a Comment