हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना संसर्गाचे केंद्र आता चीननंतर इटली झालं आहे. इटलीला करोनाने अशी काही मगरमिठी मारली आहे जी सैल करणं या देशाला अशक्य असं झालं आहे. इटलीत करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाने जगात सर्वाधिक बळी इटलीत घेतले आहेत. या गोष्टीची दाहकता केवळ या वृत्तावरून लावू शकतो कि, इटलीमध्ये मागील २४ तासांत ९०० हून अधिक जणांचा करोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. तर, ८६ हजारहून अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. स्पेनमध्येही परिस्थिती चिघळत असून एकाच दिवसात ७०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
जगभरात एकूण पाच लाख ९७ हजार जणांना करोना संसर्गाची बाधा झाली आहे. तर, २७ हजारांपेक्षाही अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एक लाख ३३ हजार जणांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये कोरोनामुळं बळी गेलेल्याची सर्वाधिक जास्त संख्या युरोपीयन देशांमध्ये आहे. ब्रिटन, स्पेन, जर्मनी सारख्या देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. युरोपीयन देशांमध्ये जवळपास ३ लाखांच्या आसपास करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
इटलीत मागील काही दिवसांपासून करोनामुळे मोठ्या संख्येने लोक मरण पावत आहेत. मृतांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास इटलीत सोमवारी ६०२, मंगळवारी ७४३, बुधवारी ६८३ आणि गुरुवारी ७१२ जणांचा मृ्त्यू झाला होता. सतत वाढत जाणाऱ्या मृत्यूंमुळे इटलीसह जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. तर, दुसरीकडे स्पेनमध्येही मृत्यूंचे थैमान सुरू आहे. स्पेनमध्ये मागील २४ तासांत ७७३ जणांचा मृ्त्यू झाला आहे. स्पेनमध्ये करोनाचे ६५ हजारहून अधिकजणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर, आतापर्यंत ५१३८ जणांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.