Monday, February 6, 2023

‘कोरोना’ वरच्या लसीचे अधिकार विकत घेण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्याविरुद्ध जर्मनीत संताप

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | जर्मनीच्या शास्त्रज्ञांनी कोरोनावर लस शोधली आहे अशी माहिती जर्मनीने दिल्यानंतर या लसीचे हक्क विकत घेण्यासाठी जर्मनीच्या कंपनीला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी रकम देऊ केल्याबद्दल जर्मनीत ट्रम्प यांच्याविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येतो आहे.

याबाबत जर्मनीच्या ‘वेल्ट अ‍ॅम सोनटॅग’ या वृत्तपत्राने पहिल्या पानावर “ट्रम्प विरुद्ध बर्लिन” शीर्षकाने वृत्त प्रकाशित केले आहे. यात जर्मनीचे अर्थमंत्री पीटर ऑल्टमियर यांनी ‘जर्मनी विकाऊ नाही’ या शब्दात संताप व्यक्त केला. ट्रम्प यांनी या लसीचे अधिकार विकत घेण्यासाठी जर्मनीच्या बायोफार्मास्युटिकल कंपनी क्युरेव्हॅकला एक अब्ज डॉलर देऊ केले होते. ही लस जर्मनीतच राहावी यासाठी जर्मन सरकार लस तयार करणाऱ्या कंपनीला आर्थिक मदत करत आहे.

- Advertisement -

यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना जर्मनीचे परराष्ट्रमंत्री हेको मास म्हणाले की, आमच्या संशोधनांचा फायदा इतरांनी घ्यावा अशी परिस्थिती आम्ही निर्माण होऊ देणार नाही. जर्मन संसदेच्या आरोग्य समितीचे सदस्य असलेले एक खासदार एर्विन रोडेल म्हणाले, स्वार्थापेक्षा आंतरराष्ट्रीय सहकार्य महत्त्वाचे आहे.

ब्रेकिंग बातम्या आता थेट मोबाईलवर मिळवा. आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करा आणि लिहा Hello News

हे पण वाचा –

करोनामुळं रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट झालं ५० रुपयाला; लोकलला सुद्धा लागू शकतो ब्रेक

करोनामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित

करोनाला फाट्यावर मारत धोनीने मारली बाईकवरून रपेट; पहा व्हायरल व्हिडिओ!

करोनामुळे महाराष्ट्रातील ‘ही’ देवस्थानं भाविकांसाठी बंद

‘या’ देशात चीनपेक्षा जास्त वेगाने पसरतोय कोरोना! २४ तासात सापडले ३५९० रुग्न