Thursday, March 30, 2023

कराड पंचायत समिती शिक्षण विभागाचे कोरोनाला आवतण, शिक्षण महोत्सवाचे आयोजन करुन शाळाकरी विद्यार्थ्यांना वेठीस धरणेचा प्रकार

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान मांडले असल्याने राज्य शासनाने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दीचे कार्यक्रम टाळा असे आवाहन केले असताना अनेक संस्थांनी महिला दिनासह अनेक कार्यक्रम रद्द करत ते पुढे ढकलले मात्र कराड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आव्हानाला कोलदांडा दाखवत कराड शिक्षण महोत्सव 2020 जोरदार साजरा केला जात आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही उपयोग केली नसल्याचे समोर आले असुन प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना महोत्सवाला येणेची सक्ती करुन वेठीस धरलेले दिसून येत आले असुन या ठिकाणी कोणतीही प्रतिबंधक उपाययोजना केलेले दिसुन येत नाही महोत्सव आयोजित करणाऱ्या पंचायत समिती पदाधिकारी व अधिकाऱ्यांची चौकशी करणेची मागणी पालक व नागरिकांमधुन होत आहे .

हा महोत्सव अगोदरच ठरला होता मात्र आता कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेणेच्या सुचेना संबंधीतांना दिल्या असलेली प्रतिक्रिया मंत्री शंभुराजे देसाईंनी दिली आहे