औरंगाबाद – मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे औरंगाबाद महानगर पालिकेच्या वतीने शहरातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्था नियमित करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
परंतु असे असतानाही काही नागरिक पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरणे, नळाला तोटी न लावणे, पाणी भरणे झाल्यावर रोडवर सोडून देणे, वाहने धुणे इ. प्रकारे पाण्याचा गैरवापर करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा नागरिकांवर महानगरपालिकेने थेट कारवाई करायला सुरवात केली आहे.
पिण्याच्या पाण्याची नासाडी करणाऱ्या 290 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामुळे आता पाण्याचा होणारा अपव्यय कमी होईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.