हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Aadhar Card हे सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट्स बनले आहे. अनेक सरकारी योजनांपासून ते बँकेशी संबंधित कामांपर्यंत सर्वत्र हे आवश्यक असलेले डॉक्युमेंट्स बनले आहेत. आधार कार्डचा वापर हे ओळखपत्र म्हणून देखील केले जाते. तसेच यामध्ये आपले नाव, फोटो, पत्ता यासंबंधीची माहिती आपल्या गरजेनुसार बदलता येतील.
इथे हे लक्षात घ्या कि, UIDAI कडून आधार कार्डमधील चुका सुधारण्यासाठी अपडेट करण्याची सुविधा पुरवली जाते. यामध्ये आपल्याला ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा पद्धतीने सुधारणा करता येतील. Aadhar Card
अपडेट करण्यासाठीचे शुल्क
नाव, मोबाईल नंबर, लिंग, बायोमेट्रिक डिटेल्स इत्यादी सर्व प्रकारची माहिती Aadhar Card मध्ये अपडेट करता येतील. यासाठी शुल्कही आहे. मात्र, जर कोणी माहिती अपडेट करण्यासाठी निश्चित शुल्कापेक्षा जास्त पैसे मागितले तर अशा परिस्थितीत uidai.gov.in वर मेल करून किंवा 1947 या क्रमांकावर कॉल करून तक्रार देखील नोंदवता येते.
मुलांसाठी कोणतेही शुल्क लागत नाही
Aadhar Card मध्ये नोंदणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. मात्र बायोमेट्रिक अपडेटसाठी 100 रुपये शुल्क द्यावे लागतील तर मुलांच्या बायोमेट्रिक अपडेटसाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. नाव, लिंग, जन्मतारीख आणि घराचा पत्ता यासारख्या डेमोग्राफिक डिटेल्स बदलण्यासाठी 50 रुपये शुल्क द्यावे लागेल. यासंबंधीची माहिती UIDAI द्वारे बारकोड स्कॅन करूनही घेता येईल.
अपडेट कसे काम करेल ???
UIDAI पासपोर्ट सेवा केंद्राप्रमाणे आधार सेवा केंद्रावरही अपॉइंटमेंटची सुविधा देत आहे. जर आधार केंद्राची अपॉइंटमेंट घेण्यासाठी UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आधार केंद्राची अपॉइंटमेंट घेता येईल. Aadhar Card
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://uidai.gov.in/
हे पण वाचा :
Gold Price Today : सोने-चांदी झाले स्वस्त, आजचे नवे दर पहा
Jandhan Account : जन धन खातेधारक खात्यामध्ये बॅलन्स नसतानाही घेऊ शकतील ₹ 10000 चा लाभ, कसे ते जाणून घ्या
HDFC Bank च्या ग्राहकांनी अशा प्रकारे करावे UPI ट्रान्सझॅक्शन, जाणून घ्या सोपी पद्धत
FD Rates : ‘या’ सरकारी बँका FD वर देत आहेत 7 टक्क्यांहून जास्त व्याज !!!
Multibagger Stock : ‘या’ केमिकल कंपनीने गुंतवणूकदारांना दिला 4000% रिटर्न !!!