कराची : वृत्तसंस्था – गाय हि सगळ्या प्राण्यांमध्ये शांत मानली जाते. शक्यतो ती कुणावर हल्ला (counter attacked of cow) करत नाही. पण जेव्हा वेळ येते, तेव्हा तीसुद्धा आपले रौद्र रूप (counter attacked of cow) धारण करू शकते. याचा प्रत्यय कराचीमध्ये आला आहे. शाच एका संतप्त गाईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका गाईने एका खाटिकाला भयंकर शिक्षा(counter attacked of cow) दिली आहे. ज्या दोरीने तिला बांधलं होतं, त्याच दोरीने तिने खाटिकाला फरफटत नेलं आहे. हा खाटिक गाईला खेचण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे गाय इतकी संतप्त झाली की तिने त्यालाच खेचलं.
गाईने खाटिकाला दिली भयंकर शिक्षा ! ज्या दोरीने बांधलं त्याच दोरीने फरफटत नेलं pic.twitter.com/lDYaBqFGu0
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 13, 2022
काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, चार लोक गायीला दोरीने बांधून तिला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवातीला गाय त्यांना (counter attacked of cow) मागे ढकलण्याचा प्रयत्न करते. पण ते लोक तिला घाबरवताना दिसतात. अखेर गाय बघून बघून घेते आणि संधी मिळताच तिथून पळ काढते. यावेळी तिला नियंत्रित करणाऱ्या एक व्यक्ती गाईला बांधलेल्या दोरीतच अडकतो आणि गाय त्याला तसेच फरफटत नेते.
यानंतर काही लोक त्याला वाचवण्यासाठी आणि गाईला पकडण्यासाठी त्यांच्या मागे पळताना (counter attacked of cow) दिसतात. पण गाय काही थांबत नाही. बऱ्याच दूरपर्यंत ती जाते. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ही घटना पाकिस्तानमधील कराचीच्या गुलिस्तान-ए-जौहर परिसरातील आहे.
हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान
आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे
नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार