हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल आगे बढो, आगे बढो, असं विधान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबईत आज 74 व्या बेस्ट दिनी बेस्ट उपक्रमाच्या पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बस गाड्याचा आणि पुनर्विकसित माहीम बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
आपण आवश्यकतेनुसार बसचा प्रवास करतो पण ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच संपूर्ण आयुष्यच बस मध्ये असत. बसची घंटा वाजवत कंडक्टर म्हणतो आगे बढो आगे बढो तस देशाला असा पंतप्रधान पाहिजे जो कायम म्हणेल आगे बढो आगे बढो असं उद्धव ठाकरे यांनी म्हणताच सगळीकडे हशा पिकला
कोरोनाकाळात बेस्टने उत्तम काम केलं. बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांना धन्यवाद. आदित्यने सांगितलं की आपल्या वचननाम्यात आम्ही म्हटलं होतं एकच तिकीट सगळ्यांसाठी पाहिजे. बेस्टची एक तिकीट सिस्टिम सुरु करण्याचा प्रयत्न आहे. बेस्ट, रेल्वे आणि मेट्रोमध्ये एकच तिकीट चालू शकेल असे म्हणत उद्धव ठाकरेंनी म्हंटल. बेस्टच्या कोणत्याही कामात काही अडचण आल्यास सरकारकडून आवश्यक ते केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.