हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी देशाने महाराष्ट्र मॉडेल सारख काम करावं अस विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. कोरोनाच्या काळात महाराष्ट्राने सर्वात चांगलं काम केलं आहे असेही ते म्हणाले. ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, देशात कोरोनाचं संकट वाढत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आता देशाला महाराष्ट्र मॉडेलनेच काम करावं लागणार आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचं खूप काम करण्यात आलं. पण कोरोनाच्या काळात महाराष्ट्राने सर्वात चांगलं काम केलं आहे. त्याची दखल आज ना उद्या कोर्ट घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोरोनाच्या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली. ते म्हणाले की, देशातील आजची परिस्थिती पाहता हे राष्ट्रीय संकटच आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे, चर्चेमध्ये कोरोनाच्या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची सातत्याने मागणी करत आहेत. ही परिस्थिती राष्ट्रीय आपत्ती असल्याचे जगानेही मान्य केले आहे. त्यामुळे आता या कोरोनाच्या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात आली पाहिजे असे राऊतांनी म्हंटल.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.