पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – पंढरपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणात न्यायलयीन कोठडीमध्ये असलेल्या एका तरुणाने जेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. न्यायालयाने या तरुणाला जामीन नाकारला होता, त्यानंतर मध्यरात्री त्याने जेलमध्ये गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट (Sucide) केला.
काय आहे नेमके प्रकरण ?
सुनील तानाजी किसवे असे आत्महत्या (Sucide) करणाऱ्या आरोपी तरुणाचे नाव होते. तानाजी याच्यावर लैंगिक अत्याचारासह इतर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल होते. सुनीलवर लैंगिक अत्याचार प्रकरणात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे त्याला मंगळवेढा कारागृहात ठेवण्यात आले होते. मंगळवेढा न्यायालयाने जामीन नाकारला होता. त्यामुळे त्याला सब जेलमध्ये ठेवण्यात आले होते. रात्री जेवणानंतर आरोपीची हजेरी घेत असताना एक आरोपी कमी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले त्यानंतर त्यांनी जेलमध्ये पाहणी केली असता सुनीलने चार कोठडीच्या बाजूला ट्रेझरीच्या बोळात मफलरच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केल्याचे निदर्शनास आले.
यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी या घटनेची खबर तात्काळ त्याच्या नातेवाईकाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. यानंतर सुनीलचा मृतदेह (Sucide) पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. परंतु, अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत शविच्छेदन करणार नाही, असा पवित्रा त्याच्या नातेवाईकांनी घेतला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???