व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

महाविकास आघाडीला गजनीची लागण; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सत्ताधारी पक्षाच्या चहापानाच्या कार्यक्रमावर आज विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला. “विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकलाय आणि सातपानी पत्र आम्हाला दिले आहे. यातले चार पाने हे बहुधा आमचेच आहेत. त्यातल्या अक्षरांमध्ये फार बदल नाहीय. त्यामुळे हे पत्र देताना विरोधी पक्षाला या गोष्टीची विस्मृती झाली की ते दीड महिन्यापूर्वी सत्तेत होते. त्यामुळे सुधीरभाऊ म्हणतात कि, विरोधकांना गजनीची लागण झाली आहे, असे म्हणत फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा ‘गजनी’ असा उल्लेख केला.

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली यावेळी दोघांनी अजित पवारांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. यावेळी फडणवीस म्हणाले की, आम्ही बेईमानीने सत्तेत आलो आहे असे विरोधी पक्षनेते म्हणतात. पण महाविकास आघाडीचे सरकारच बेईमानीचं सरकार होतं.

जनमताचा अपमान करुन ते सरकार आलं होतं. त्या सरकारमध्ये 32 दिवस विस्तार झाला नव्हता. 35 दिवस त्यांचाही विस्तार झालेला नव्हता. त्यांनी आमच्या सरकारची चिंता करण्यापेक्षा विरोधकांच्या एकजुटीची चिंता केली पाहिजे. कारण नुकतेच ते विरोधात गेल्यानंतर तीन पक्षांच्या तीन दिशा बघायला मिळत आहेत. विरोधी पक्षनेता आम्हाला न विचारता केला यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

राज्यात 46 दिवसांमध्ये लोकांना फरक दिसतोय – फडणवीस

यावेळी फडणवीस यांनी ‘मविआ’वर टीका केली. “सर्वसामान्यांचं सरकार आल्यासारखे वाटत आहे. या ठिकाणीही पाय ठेवायला जागा नाही. नाहीतर मंत्रालय रिकामी होतेच. आता कुठेही पाय ठेवायला जागा नाही, असे चित्र आहे. आम्ही सर शेतकर्याना मदत केली मात्र, महाविकास आघाडी सरकारने नऊ-नऊ महिने मदत केली नाही”, अशी टीका फडणवीसांनी केली.