अशाप्रकारे सेहवागने सुरु केले स्थलांतरित मजूरांसाठी ‘घर से सेवा’ अभियान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोनाच्या साथीनं निर्माण झालेल्या परिस्थितीत देशभरात विविध ठिकाणी अडकलेले आहेत. लॉकडाउनमूळ काम ठप्प आहे. त्यामुळे अनेकांचे हातचे काम गेले आहे. अशा बिकट परिस्थितीत मजुरांवर उपासमारीचेही वेळ आली आहे. अशा मजूरांना मदत करण्यासाठी अनेक संस्था, विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी, तसेच इतर काही जण वैयक्तिक पातळीवर जमेल तशी मजूरांना मदत करत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग सुद्धा अशा मजूरांच्या मदतीसाठी पुढे आला असून तो संबंधित मजूरांसाठी जेवण तयार करून देत आहे. फक्त हा क्रिकेटपटू नव्हे तर त्याची आई, पत्नी आणि दोन मुले या कामात त्याची मदत करत आहेत.

प्रवासी मजूरांसाठी सेहवागने ‘घर से सेवा’ नावाचे अभियान सुरू केले. लॉकडाऊनमुळे प्रवासी मजूरांना घरची वाट धरावी लागत आहे. अशा लोकांसाठी सेहवाग मदत करत असून त्यात आई कृष्णा, पत्नी आरती आणि आर्यवीर, वेदांत ही दोन मुले मदत करत आहेत. सेहवाग कुटुंबियांनी प्रवासी मजूरांसाठी घरीच जेवण तयार केले. त्यानंतर ते पॅक करून त्याचे वाटप केले गेले. यासाठी त्याने #GharSeSewa हा हॅशटॅग वापरला आहे. इतक नव्हे तर तुम्ही १०० लोकांचे जेवण तयार करून देणार असाल तर सेहवाग फाउंडेशनशी (@SehwagFoundatn) संपर्क करावा, असे त्याने म्हटले आहे. लोकांना मदत करण्याची सेहवागची ही पहिली वेळ नाही. तो सेहवाग फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक वेळा मदत करत असतो.

भारतीय संघातील माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटो संपूर्ण सेहवाग कुटुंबीय प्रवासी मजूरांसाठी जेवण तयार करून ते पॅक करत आहे. सेहगाने हा फोटो शेअर करताना अन्य लोकांना मदत करण्याचे आवाहन केले. सेहवागच्या या प्रयत्नांचे आणि आवाहनाचे सर्व जण कौतुक करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”