पुणे । देशात कोरोनाची सर्वाधिक गंभीर परिस्थिती ही पुण्यात असल्याचं मत केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यातील कोरोनाच्या गंभीर स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी आज पुण्यात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत विधान भवन येथे विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात टेस्टिंग वाढविण्याच्या सूचना केल्या. जिथे गंभीर परिस्थिती आहे तिथे अधिकचे लक्ष घालून त्यामागची कारणे शोधून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना जावडेकर यांनी अधिकाऱ्यांना केल्या. मास्क न घालणार्या लोकांवर आणि कुठेही थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. अशा गोष्टी टाळल्यास करोनाबाधित रुग्ण संख्येची साखळी तोडण्यास मदत होणार असल्याचे जावडेकर म्हणाले. तसेच शहरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर सिरो सर्व्हे करण्यात येणार आहे. यामध्ये गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना सहभागी करून घेणार आहे. पण यासाठी नागरिकांचा सहभाग असणे जरुरीचे असून केंद्र सरकार पुणेकर नागरिकाच्या कायम सोबत आहे, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
कोरोना रुग्ण वाढण्याची करणे ही यावेळी त्यांनी जावडेकरांना सांगितले.केंद्र सरकार नागरिकांना कोरोनापासून दिलासा देण्याकरिता डरो मत..सावधानी करो असा नारा देत आहे. याबद्दल नागरिकांमध्ये प्रबोधन केले पाहिजे अशा सूचनाही जावडेकर यांनी यावेळी केल्या.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.