“जगातील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस उपलब्ध होण्यासाठी किमान 4-5 वर्षे लागतील”: सीरम इंस्टीट्यूट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (CII) चे मुख्य कार्यकारी आदर पुनावाला (Adar Poonawalla) म्हणाले की,”2024 पूर्वी कोविड -१९ ही लस जगातील सर्व लोकांना उपलब्ध होणार नाही. जगातील संपूर्ण लोकसंख्येस कोरोना विषाणूची लस देण्यासाठी फार्मा कंपन्या त्यांची उत्पादन क्षमता वेगाने वाढवत नाही आहेत.” त्यांनी फायनान्शियल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,” जगातील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस उपलब्ध होण्यासाठी किमान 4-5 वर्षे लागतील.”

15 अब्ज डोस तयार करण्याचे आव्हान
पुनावाला एका अंदाजानुसार म्हणाले की,” एखाद्या व्यक्तीला कोरोना विषाणूच्या लसीचे दोन डोस दिले तर याचा अर्थ असा आहे की, कमीतकमी 15 अब्ज डोस तयार करावे लागतील. अशा परिस्थितीत कोविड -१९ लसीसाठीही तसाच पुढाकार घेण्याची गरज भासणार आहे, जशी गोवर गोवरच्या लसीसाठी केली गेली होती.

त्यांनी भारतात कोविड -१९ लसीच्या वितरणा विषयी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की,” येथे कोल्ड चेन इन्फ्रास्ट्रक्चर अत्यंत वाईट अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत 1.4 अब्ज लोकांपर्यंत सुरक्षितपणे लस पोहचवणे हेदेखील एक मोठे आव्हान असेल.”

5 कंपन्यांच्या सहकार्याने लस तयार करत आहे सीरम
सीरम संस्था हा कौटुंबिक व्यवसाय आहे. जगातील 5 कंपन्यांशी त्याचे करार आहेत. यात अॅस्ट्रॅजेनेका आणि नोव्हाव्हॅक्स देखील आहेत. या कंपन्यांसमवेत सीरम संस्थेने 1 अब्ज डोस करण्याचे आणि भारतात 50 टक्के देण्याचे आश्वासन दिले आहे. कंपनी Sputnik Vaccine चे उत्पादन सुरू करण्यासाठी रशियाच्या गमालेया संशोधन संस्थेबरोबर (Gamaleya Research Institute) करार करू शकते.

कोरोनाव्हायरस लसीचे प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्यूशन या विषयावर पूनावाला यांचे विधान महत्त्वपूर्ण ठरते. कारण अनेक विकसनशील देशांच्या बहुतेक लसींचे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट करते. पूनावाला म्हणाले की, “उत्पादनाच्या बाबतीत जगाला या बाबतीत सकारात्मक बातमी हवी आहे, परंतु ते मिळवणे शक्य आहे असे मला वाटत नाही.” AstraZeneca बरोबरोबरील करारानुसार, सीरम संस्था 68 देशांसाठी आणि 92 देशांसाठी Novavax सह लस तयार करीत आहे.

AstraZeneca चाचणी सुरू झाली आहे
आदर पूनावाल हे सायरस पूनावाला यांचा मुलगा आहे. जे भारतातील सातव्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती आहेत. आदर पूनावाला म्हणाले की, गेल्या आठवड्यात चाचणीच्या वेळी कॅन्डीडेट आजारी पडल्यानंतर AstraZeneca ने चाचणी थांबविली होती, परंतु आता पुन्हा ही चाचणी सुरू झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.