हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. शनिवारीही कोरोनाबाधितांच्यात वाढ झाली. कराड शहरात शनिवारी चार कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने शहरातील रुग्ण संख्या ५२ झाली असून तालुक्याची रुग्णसंख्या 101 इतकी झाली आहे. पालिका प्रशासनाच्या विभागाने खबरदारी घेण्याच्या सूचना कराडकरांना केलेल्या आहेत.
कराड शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. अशात पालिकेच्या आरोग्य प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना वारंवार केल्या जात आहेत. तसेच नागरिकांच्या आरोग्याबाबत दक्षताही घेतली जात आहे. शनिवारी हाती आलेल्या आकडेवारीमध्ये कराड शहरातील सोमवार पेठ व गुरुवार पेठ या दोन पेठांमध्ये एकूण चार रुग्ण आढळले आहेत. त्यातील सोमवार पेठेत तीन तर गुरुवार पेठेत एक असे रुग्ण आहेत. ते सध्या होम आय सोलेशन मध्ये आहेत. तर शनिवारी चार रुग्ण संख्येमुळे शहरातीळ एकूण रुग्णसंख्या ५२ अशी झाली आहे.
दरम्यान शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या आकडेवारीनुसार, कराड शहरात एकूण ६ त्यामध्ये मंगळवार पेठ १, सोमवार पेठ ४, विद्यानगर १ तर तालुक्यात खुबी ३, बेलवडे बु.१, बारवकरनगर २, कोडोली १, शेरे ४, संगमनगर १, शेणोली १, मलकापूर ६, कोळेवाडी १, घोणशी १, पाडळी ४, हेळगाव १, साकुर्डी ३, सुपने ३, डेळेवाडी १, केसे ६, अंधारवाडी १, कासारशिरंबे १, चरेगाव १, वनमासमाची वाडी १, गुरुवार पेठ १, काले १, तळबीड १, जुळेवाडी १, उंडाळे १, कार्वे १ असे एकूण ४९ रुग्ण आढळले.
सातारा जिल्ह्यात जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात काही प्रमाणात कोरोना बाधितांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, मार्च महिन्यात हे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहेत. चालू आठवडाभरात आकडा चांगलाच वाढलेला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण १८९२ हुन अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात जिल्हाधिकारी तसेच प्रशासनाने लावलेले निर्बंध व त्यावरील कारवाई कोठेच होताना दिसत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस कोरना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना बाधितांची वाढणारी संख्या जिल्ह्यासाठी चिंताजनक आहे. अशात कराड शहरात पालिका प्रशासनाकडून नागरिकांना नियमित मास्क वापरण्याबाबत सूचना केल्या जात आहेत. मात्र नागरिकांकडून पालिकेच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा परिस्थितीत शनिवारी कराड शहरात चार जन कोरोना बाधित आढळले आहेत.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा