हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून चिंता वाढली आहे. राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध घातले असून देखील कोरोना रूग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. दरम्यान राज्यात बुधवारी नऊ हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.
दिवसभरात राज्यात ९ हजार ८५५ नवीन करोनाबाधित वाढले असुन, ४२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४० टक्के एवढा आहे. तर, आज ६ हजार ५५९ रुग्ण बरे होऊन घरी देखील परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २०,४३,३४९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.७७ टक्के एवढे झाले आहे.
दरम्यान, राज्यात करोनाचे रुग्ण वेगाने वाढत असून दुसऱ्या लाटेची शक्यताही बळावत चालली आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. अनेक प्रतिबंधात्मक पावले टाकण्यात येत आहे. दुसरीकडे लसीकरणही युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. असे असताना रुग्णसंख्या मात्र कमी होताना दिसत नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’