देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ; रुग्णांची संख्या ८ लाखांच्या जवळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात कोरोना विषाणूचा कहर अजूनही कायम असून करोनाबाधित रुग्णांची झपाट्यानं वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात २६ हजार ५०६ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ४७५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना मृत्यूंची संख्या २१ हजार ६०४ इतकी झाली आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८ लाखांच्या जवळ पोहचली आहे. मागील २४ तासांत वाढलेल्या रुग्णांमुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्ण ७ लाख ९३ हजार ८०२ इतके झाले आहेत. दोन लाख ७६ हजार ६८५ जणांवर उपचार सुरू आहेत. तर ४ लाख ९५ हजार ५१३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

दररोज २० हजारांच्या पुढे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरीही उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण आधिक आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६० टक्केंपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्र, दिल्ली, मध्यप्रदेश, गुजरात, तामिळनाडू यासारख्या राज्या करोनाबाधितांची संख्या वाढत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment