कंगना गेली भुर्रर्र..! कोरोनामुक्त झाल्यावर सोडली मुंबई; व्हिडीओ झाला वायरल

0
39
Kangna Ranaut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री कंगना रनौतने कोरोनावर मात केली होती. तिचा कोरोना रिपोर्ट नेगेटीव्ह आल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना सांगितले होते. ८ मे २०२१ रोजी कंगनाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तिने स्वत:ला होम क्वारांटाईन केले होते. त्यानंतर आता योग्य ते उपचार घेऊन कंगना कोरोनातून बरी झाली आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर कंगना आपल्या मनालीतल्या घरी लगेच रवाना झाली आहे. तिला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले आहे. कंगनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

https://www.instagram.com/p/CPFM1TPjH1H/?utm_source=ig_web_copy_link

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून कंगनाचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. यानंतर हा व्हिडीओ खूप व्हायरल होतो आहे. व्हिडिओमध्ये कंगना आपल्या कारमधून खाली उतरत विमानतळाकडे जाताना दिसते आहे. यादरम्यान कंगनाने एक सुंदर साडी परिधान केली आहे. तर तिने डोळ्यांवर काळा चष्माही लावलेला दिसला. यावेळी, जेव्हा फोटोग्राफर्स तिला तिच्या आरोग्याबद्दल विचारतात तेव्हा ती म्हणते की ती ठीक आहे आणि ती विचारते कोणा-कोणाला कोरोना झाला आहे’ आणि कुणी कुणी व्हॅक्सिन घेतले आहे.

https://www.instagram.com/tv/CPAbpb1hYMn/?utm_source=ig_web_copy_link

कोरोनातून बरं झाल्यावर कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ आणि इन्स्टा रील पोस्ट केले होते. यात ती म्हणाली होती, तुमच्या सगळ्यांचे प्रेम आणि आशिर्वादामुळे मी कोरोनामुक्त झाले आहे. मी कोरोनाला कशा पद्धतीने हरवू शकले याबद्दल मला खूप काही सांगायचे आहे. पण मला कोविड फॅन क्लबला दुखवायचे नाही म्हणत पुन्हा एकदा लक्ष वेधून घेत आहे. जर आपण विषाणूबद्दल काही अनादर दाखवला तर काही लोक खरोखरच दुखावले जातात. तुमच्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. “

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here