सांगली प्रतिनिधी । जगभरात जीवघेण्या कोरोना व्हारसरवर उपचार लस शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र, अजूनही जगभरातील शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना यश आलेलं नाही आहे. हा रोग जगभर फैलावातच असून हजारोंचे बळी आतापर्यन्त या कोरोनाने घेतले आहेत. अनेक देश उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहेत. अशा संकट काळात आपल्या बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे गुरुजींनी आपलं ज्ञान पाजळत कोरोनावर एक अजब रामबाण इलाज सुचवला आहे. आपल्या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी या कोरोनावर मात करण्यासाठी गाईचं तूप आणि गोमुत्रचं पुरे असल्याचं सांगितलं आहे.
हे सांगताना आपल्या आयुर्वेदाच्या अभ्यासाचा दाखला देत भिडे म्हणाले कि, ”जे काही जंतू आपल्या नाकावाटे आपल्या शरीरात जातात त्या सर्व प्रकारच्या जंतूंचा नाश करण्याची ताकद गाईच्या तुपात आणि गोमूत्रात आहे. त्यामुळं जे कोणी कोरोनाबाधित रुग्ण आहेत त्यांच्या नाकात दर २ ते ३ तासांनी तुपाचे थेंब फिरवले किंवा त्यांना गोमूत्र प्यायला दिले तर ते रुग्ण लवकर बरे होतील” असा सल्ला भिडे गुरुजींनी डॉक्टरांना दिला आहे.
इतकेच नव्हे तर सर्व कोरोना रुग्णांवर गाईच्या तुपाचा आणि गोमुत्राचा उपयोग करावा अशी विनंती सुद्धा भिडे गुरुजींनी केंद्र आणि राज्य शासनाला केली आहे. याचसोबत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकाने जी संचारबंदी लागू केली आहे तिला हटविण्याचे भिडेंनी म्हटलं आहे.”जगात कोरोनामुळं मरण पावलेल्या व्यक्तींमध्ये सर्वात जास्त संख्या ७० ते ८० वर्षाच्या लोकांची आहे. अशक्त आणि कमजोर व्यक्तींनाच कोरोना बांधतो म्हणून तरुण वयातील पोरांना मैदानावरती निख्खळ खेळायला, पळायला सोडावं. तसेच आताच्या बंधनात शिथिलता आणावी” असंही आपल्याला वाटतं असल्याचं भिडे गुरुजींनी सांगितलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’
हे पण वाचा –
सोने चांदीच्या भावात झपाट्याने घट सुरुच, जाणुन घ्या आजचा दर
Breaking | पुण्यात कोरोनाचा पहिला बळी
WhatsApp ने स्टेटस व्हिडिओ १५ सेकंदाचा का केला? जाणुन घ्या या बदलाचे कोरोना, चीन कनेक्शन
महाराष्ट्रात करोनाबाधितांचा आकडा २१५वर
धक्कादायक! अमेरिकेत १ ते २ लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती
जगातील पहिल्या कोरोनाग्रस्ताचा लागला शोध, कोण आहे ‘हा’ व्यक्ती? घ्या जाणून
भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?
इटलीमध्ये कोरोनाचे एवढे बळी का?
नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन
[youtube https://www.youtube.com/watch?v=eMGvRKFXYM0&w=560&h=315]