ड्यू डेटनंतरही पेनल्टीशिवाय भरता येते Credit Card चे बिल, जाणून घ्या RBI चे नियम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Credit Card वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी झाली आहे. क्रेडिट कार्डद्वारे आपल्याकडे पैसे नसतानाही पेमेंट करता येते. क्रेडिट कार्डे वापरण्यासही अगदी सोपी आहेत. याशिवाय त्याचे अनेक फायदे देखील आहेत. मात्र क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी अंतिम तारीख देखील असते. आपल्याकडे बिल आल्यानंतर त्या तारखेपर्यंतच बिल भरावे लागते. जर असे केले नाही तर आपल्याला दंडही भरावा लागेल. याशिवाय आपले क्रेडिट स्कोअरही खराब होईल.

Credit Card Payment Rule: RBI Allows Three Days Post Deadline To Clear Dues

हे लक्षात घ्या कि, अनेकदा लोकं आपल्या Credit Card चे बिल देय तारखेला भरायला विसरतात. अशा परिस्थितीत त्यांचा क्रेडिट स्कोअर खराब होण्याची भीती असते. मात्र, आपल्याला हे माहिती आहे का कि, देय तारखेनंतरही आपल्याला दंडाशिवाय क्रेडिट कार्डचे बिल भरण्याची सुविधा मिळते. तसेच याचा आपल्या क्रेडिट स्कोअरवरही परिणाम होत नाही. चला तर मग याबाबत RBI चे नियम जाणून घेऊयात…

Standard Chartered Credit Card Payment (How To Use It)

इतके दिवस ठोठावला जात नाही दंड

RBI कडून गेल्या वर्षी Credit Card चे बिल भरण्याबाबत एक नवा नियम लागू करण्यात आला होता. ज्यामध्ये देय तारखेनंतर कोणताही दंड न भरता बिल भरण्याची तरतूद करण्यात आली आहे. या नियमानुसार, क्रेडिट कार्डधारकाला देय तारखेनंतरही 3 दिवसांपर्यंत क्रेडिट कार्डचे बिल दंडाशिवाय भरता येईल. म्हणजेच, जर आपण क्रेडिट कार्डचे बिल देय तारखेला भरण्यास विसरलात, तर अतिरिक्त पैसे न भरता पुढील तीन दिवसांत बिल भरता येईल.

New RBI rules for online payments from 1 January. What it means for debit,  credit card holders | Mint

3 दिवस क्रेडिट स्कोअरवर कोणताही होणार नाही

RBI च्या नवीन नियमांनुसार, जर आपण Credit Card चे बिल देय तारखेनंतर पुढील 3 दिवसांमध्ये भरले तर यासाठी आपल्याला कोणताही दंड भरावा लागणार नाही. तसेच त्याचा आपल्या क्रेडिट स्कोअरवर देखील परिणाम होणार नाही. अशा परिस्थितीत, जर आपल्या क्रेडिट कार्डचे बिल एका महिन्यात देय तारखेला भरण्यास विसरलात किंवा वेळेवर पैशांची व्यवस्था केली नाही, तर आणखी 3 दिवस काळजी करण्याची गरज नाही.

Auto-debit transactions/payment rules to change from October 1 - What gets  affected, what not

एवढा दंड भरावा लागेल

मात्र इथे हे लक्षात घ्या कि, जर आपण देय तारखेच्या 3 दिवसांनंतरही Credit Card चे बिल भरले नाही, तर कंपनीकडून यासाठी दंड आकारला जाईल. या दंडाची रक्कम क्रेडिट कार्ड बिलावर अवलंबून असेल. जर आपले बिल जास्त असेल तर जास्त दंड भरावा लागेल. उदाहरणार्थ, SBI कडून 500 ते 1,000 रुपयांच्या बिलावर 400 रुपये दंड आकारला जातो. तसेच, 1,000 ते 10,000 रुपयांच्या रकमेसाठी 750 रुपये आणि 10,000 ते 25,000 रुपयांच्या बिलासाठी 950 रुपये दंड आकारला जातो.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/scripts/NotificationUser.aspx?Id=5110&Mode=0

हे पण वाचा :
New Business Idea : घरबसल्या कमी खर्चात ‘हे’ व्यवसाय सुरू करून दरमहा मिळवा हजारो रुपयांचे उत्पन्न
Oppo Find N2 Flip ची भारतात विक्री सुरू, दिला जातोय जबरदस्त डिस्काउंट
Share Market : आज सेन्सेक्समध्ये 355 तर निफ्टीमध्ये 114 अंकांनी झाली वाढ
Tax Saving Tips : ‘या’ 5 योजनांमध्ये गुंतवणूक करून वाचवा येईल टॅक्स, कसे ते जाणून घ्या
DigiLocker अ‍ॅपद्वारे अशाप्रकारे आपल्या स्मार्टफोनमध्ये ठेवा Driving Licence