हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने पदार्पणाचा आपला कसोटी सामना आठवला तेव्हा त्याच्याकडे फक्त एक जोडी शूजच होते.जे त्याने रणजी ट्रॉफी पदार्पण आणि कसोटी पदार्पण या दोन्ही ठिकाणी वापरला.
आशिष नेहराने आपला दिल्लीचा माजी सहकारी आकाश चोप्रा याच्याशी त्याच्या आकाशवाणीच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले की,“माझ्याकडे एकच शूजची जोडी होती जी मी रणजी करंडक स्पर्धेत घातली होती आणि तीच जोडी मी १९९९ मध्ये कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्ध झालेल्या माझ्या पहिल्या कसोटी सामन्यातही घातली होती.मला आठवत आहे की प्रत्येक इनिंगनंतर मी शूज शिवायचो.”
विशेष म्हणजे हे दोन्ही खेळाडू दिल्लीचे आहेत आणि या संभाषणादरम्यान दोघांनीही दिल्लीच्या रेसकोर्स मैदानावर आपल्या क्लब संघाकडून खेळलेला सामना आठवला.
आकाश म्हणाला, “तुला माहित आहे का आम्हाला वाऱ्यासह वाऱ्याच्या विरुद्ध गोलंदाजी करावी लागायची.एकदा कोच मला म्हणाले की,”मी तुला त्या टोकाकडून गोलंदाजी का दिली नाही मग त्यावर मी म्हणालो की,”तुम्ही त्या बाजूने गोलंदाजी करावी अशी तुमची इच्छा आहे.”
नेहरा भारताकडून १७ कसोटी सामने खेळला आहे. याशिवाय त्याने भारताकडून १२० एकदिवसीय सामने आणि २७ टी -२० सामने खेळले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.