वृत्तसंस्था । कोरोना संकटमुळे जगातील सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या असून यात ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धेचा समावेश आहे. क्रीडा स्पर्धा कधी सुरू होतील हे आताच सांगता येणार नाही. मात्र, कोरोना संकट असताना देखील क्रिकेट ऑस्ट्रेलिया २०२०-२१च्या कार्यक्रमाबद्दल आशावादी आहे. यात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचा समावेश आहे. तर भारतासोबतचा हाय व्होल्टेज दौरा देखील आहे. करोना संकटामुळे भारत दौरा आणि टी-२० वर्ल्ड कप प्रेक्षकांशिवाय रिकाम्या स्टेडियमवर खेळवण्याची शक्यता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने व्यक्त केली आहे. अशा प्रकारे सामने खेळवण्याची तयारी देखील त्यांची आहे. जर अस घडल्यास क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय पार पडेल.
दरम्यान, कोरोनामुळे ऑस्ट्रेलियाने सर्व आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक सामने स्थगित केले आहेत. खेळ लवकर सुरू व्हावेत अशी सर्वांची इच्छा आहे. पण ते कधीही ते कधी सुरू होतील हे निश्चितपणे कोणीही सांगू शकत नाही. जर परिस्थितीत सुधारणा झाली तर सामने होण्यासाठी वेगळा विचार करावा लागले, असे संकेत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिले आहेत. भारतात देखील बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा स्थगित केल्या आहेत. दरम्यान, बीसीसीआयने सुद्धा यंदाची आयपीएल स्पर्धा प्रेक्षकांशिवाय रिकाम्या स्टेडियमवर खेळवण्याचा विचार केला आहे. परंतु जगातील परिस्थिती पाहता बीसीसीआयने सध्या परिस्थिती जोपर्यन्त सुधारणार तोपर्यंत आयपीएल स्पर्धा स्थगित केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”