लंडन : वृत्तसंस्था – क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात सलग तीन बॉलवर बॅट्समनला आऊट करून हॅट्ट्रिक घेणे हा दुर्मिळ योगायोग आहे. सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विटालिटी ब्लास्ट या क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडच्या दोन बॉलर्सनी एकाच दिवशी हॅट्ट्रिक घेतली आहे. आणि ह्यामध्ये विशेष म्हणजे या दोघांनीही मॅचच्या शेवटच्या तीन बॉलवर हि हॅट्ट्रिक घेतली आहे. न्यूझीलंडच्या एडम मिल्नेने केंटकडून तर लॉकी फर्ग्युसनने यॉर्कशरकडून खेळताना हि हॅट्ट्रिक घेतली.
यॉर्कशर विरुद्ध लँकशर मॅचमध्ये फर्ग्युसनने हॅट्ट्रिक घेतली. फर्ग्युसनने सुरुवातीला कॅप्टन डेन विलासला आऊट केले होते. यानंतर रॉब जोन्सने 48 बॉलमध्ये नाबाद 61 रन काढत टीमला जिंकावण्यासाठी जोरदार संघर्ष केला पण तो अपूर्ण पडला. फर्ग्युसनने इनिंगच्या शेवटच्या तीन बॉलवर ल्यूक वेल्स, ल्यूक वूड आणि टॉम हर्टली यांना आऊट करत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. तसेच यॉर्कशरला विजयदेखील मिळवून दिला.
LOCKIE FERGUSON HATTRICK 🔥
Look at those scenes 😍#Blast21 pic.twitter.com/QaFAp25KAZ
— Vitality Blast (@VitalityBlast) July 2, 2021
एडम मिल्नेची कमाल
केंट विरुद्ध सरे यांच्यातील मॅचमध्ये देखील असाच प्रकार घडला. केंटने सरेला विजयासाठी 191 रनचे टार्गेट दिले होते. सरेची सुरुवात खराब झाली पण त्यानंतर विल जॅक्सने 54 बॉलमध्ये 87 रन करत टीमला विजयाच्या जवळ आणले होते. त्यावेळी आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या एडम मिल्नेने शेवटच्या तीन बॉलवर मॅचचे चित्र बदलवले. एडम मिल्नेने न्यूझीलंडचा ऑल राऊंडर काईल जेमिसनसह तिघांना आऊट करून संघाला विजय मिळवून दिला. या मॅचमध्ये मिल्नेने 38 धावांमध्ये 4 विकेट्स घेतल्या.