मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात एजबस्टनमध्ये सुरू असलेल्या पाचव्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ऑल राऊंडर रविंद्र जडेजाने (ravindra jadeja) शतक झळकावले आहे. जडेजाचं (ravindra jadeja) विदेशातील हे पहिलंच शतक आहे. टीम इंडिया अडचणीत असताना विकेटकिपर रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा (ravindra jadeja) यांनी केलेल्या भागीदारीमुळे भारतीय टीमचा स्कोअर 400 रनच्या पुढे नेण्यात मोलाची भूमिका होती. रिषभ पंत आणि रवींद जडेजा (ravindra jadeja) यांनी या सामन्यात शतक झळकावले आहे. एजबस्टनमध्ये शतक झळकावलेल्या जडेजासाठी यंदाची आयपीएल स्पर्धा निराशाजनक ठरली.
यावेळी पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्सने टीमची कॅप्टनसी जडेजाकडे (ravindra jadeja) दिली होती. पण खेळाडू आणि कॅप्टन म्हणून फेल गेल्यानंतर त्यानं अर्ध्या सिझननंतरच कॅप्टनसी सोडली. यानंतर महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा सीएसकेचा कॅप्टन झाला. त्यानंतर जडेजानं दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली. त्यानंतर जडेजाने पहिल्यांदाच आयपीएलमधील सर्व घटनांवर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले रवींद्र जडेजा ?
एजबस्टन टेस्टच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जडेजानं (ravindra jadeja) सांगिकलं की, ‘जे झालं ते झालं. मी त्यामधून बाहेर पडलो आहे. आयपीएल माझ्या डोक्यात नाही. भारतीय टीमकडून खेळताना संपूर्ण लक्ष हे टीमच्या विजयावर असला पाहिजे. माझंही त्यावरच लक्ष आहे. भारतासाठी चांगली कामगिरी करण्यासारखी आनंदाची गोष्ट कोणतीही नाही.’ असे जडेजा (ravindra jadeja) यावेळी म्हणाला. तसेच भारताच्या बाहेर शतक झळकावणं ही खरंच खास गोष्ट आहे. विशेषत: इंग्लंडमध्ये एक खेळाडूासाठी 100 रन करणे ही खरोखर मोठी गोष्ट आहे. यामुळे आत्मविश्वासामध्ये भर पडतो. इंग्लंडमधील स्विंग परिस्थितीमध्ये शतक झळकावणे हा संस्मरणीय अनुभव आहे,’ असे जडेजाने यावेळी स्पष्ट केले.
हे पण वाचा :
सत्ता गेली पण माज काही केल्या जात नाही…; गोपीचंद पडळकरांची घणाघाती टीका
अजून किती वर्षांपर्यंत राहणार भाजप युग?; अमित शाहांनी दिले ‘हे’ उत्तर
Whatsapp ने आणले नवे फीचर्स; 2 दिवसांपूर्वीचा मेसेजही डिलीट करता येणार
देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात किती पक्षी मारले?
PNB ग्राहकांना खुशखबर!! FD वरील व्याजदरात वाढ