हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक आपल्या काळातील धडकी भरवणारा फलंदाज आहे. त्याने पाकिस्तानकडून एकूण १२२ कसोटी आणि ३७८ एकदिवसीय सामने खेळलेले आहेत.यादरम्यान इंझमामचा भारताविरुद्ध विशेष रेकॉर्ड आहे. अलीकडेच त्याने आपला मित्र रमीज राजा याच्याशी केलेल्या व्हिडिओ चॅटमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या फलंदाजांची तुलना केली ज्यात त्याने सांगितले की भारतीय संघ मैदानावर नाही तर केवळ कागदावरच मजबूत आहे.
इंझमाम म्हणाला, “भारतीय संघाची फलंदाजी आमच्यापेक्षा निश्चितच चांगली होती पण मैदानावर दोन्ही संघांमध्ये मोठा फरक होता. जरी पाकिस्तानी फलंदाजांनी ३० किंवा ४० धावा केल्या तरी त्यातली प्रत्येक धाव हि पाकिस्तान संघासाठी होती, तर भारतीय फलंदाज संघासाठी नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या विक्रमासाठी खेळले.
याशिवाय इंझमामने पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या नेतृत्वातही काही त्रुटी होत्या असे सांगितले आहे.तो म्हणाला,”इम्रान निःसंशयपणे एक उत्तम खेळाडू होता परंतु त्याच्या नेतृत्वात काही तांत्रिक त्रुटी होत्या.मात्र,खेळाडूंना सांगत घेऊन कामगिरी कशी करावी हे त्याला माहित असल्याने तो यशस्वी कर्णधार असल्याचे सिद्ध झाले.
रमीज राजाशी झालेल्या संभाषणादरम्यान इंझमाम ने १९९२ च्या विश्वचषकादरम्यानच्या आठवणीही ताजा केल्या.तो म्हणाला की,”मी वर्ल्ड कपमध्ये धावा काढत नव्हतो पण इम्रान खानचा माझ्यावर विश्वास होता आणि त्याने मला सतत संधी दिली.”
इंझमामने वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या निर्णायक सामन्यात पाकिस्तानकडून ३७ चेंडूत ६० धावांची जिगरबाज खेळी केली,तर इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यातही त्याने तुफान फलंदाजी करताना ३५ चेंडूत ४२ धावांचे योगदान दिले.मात्र, इंझमाम याने इम्रान खानच्या कर्णधारपदाचे कौतुक केले. ते म्हणाले, “आम्ही असे म्हणू शकतो की इम्रान भाई तांत्रिकदृष्ट्या चांगला कर्णधार नव्हता परंतु खेळाडूंकडून आपला खेळ कसा काधून घ्यायचा हे त्याला चांगलेच माहित होते.तो नेहमीच खेळाडूंचा बचाव करीत असे, त्याने संघातील खेळाडूंवर विश्वास ठेवला. म्हणूनच तो एक महान कर्णधार बनला आहे. ”
तो म्हणाला,”जर एखादा खेळाडू कोणत्याही एका मालिकेत चांगली कामगिरी करू शकला नाही तर इम्रान खानने त्याला संघातून वगळले नाही.तो त्यांच्यावर विश्वास ठेवत असे आणि त्यांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी द्यायचा.म्हणूनच संघातील सर्व खेळाडू त्याचा आदर करत होते .
पृथ्वीवर आणखीन एक मोठे संकट, ओझोन थराला पडलेय मोठे छिद्र#HelloMaharashtrahttps://t.co/yT96JZZylX
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 10, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.