म्हणूनच आपल्या पाकिस्तान देशातील खेळाडूंचा विक्रम मोडण्याची इच्छा इंझमाम उल हकला कधीही नव्हती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । प्रत्येक खेळाडूला क्रिकेटच्या क्षेत्रात विक्रम करायचा असतो. एवढेच नव्हे तर अनेक फलंदाज सामन्यात नेहमीच विक्रम नोंदवत असतात. यामुळे या नोंदी तरुण खेळाडूंना प्रेरणा देतात आणि त्यांनाही दिग्गजांचा विक्रम मोडायचा असतो.मात्र यादरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने एक रोचक गोष्ट सांगितली आहे. त्याचे असे म्हणणे होते की आपल्या देशातील (पाकिस्तान) खेळाडूंचे रेकॉर्ड तो कधीही तोडू इच्छित नव्हता.

विशेष म्हणजे पाकिस्तानसाठी कसोटी क्रिकेटमध्ये दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा करणारा माजी कर्णधार इंझमाम म्हणाला की त्याने आपल्या देशाचा खेळाडू हनिफ मोहम्मदचा विक्रम मोडण्याचा कधीही विचार केलेला नव्हता.

हनिफने १९५८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ३३७ धावा फटकावल्या होत्या. इंझमामने २००२ मध्ये लाहोरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ३२९ धावा केल्या.

Inzamam Ul HAQ- India TV

या सामन्यात पाकिस्तानचा माजी कर्णधाराला दुसर्‍या टोकाकडून कोणाचीही साथ मिळाली नाही आणि मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तो हनीफचा विक्रम मोडण्यास चुकला. इतकेच नव्हे तर त्याने असेही म्हटले होते की इंझमामला पुढच्या सामन्यात इतर फलंदाजाची साथ मिळाली असती तर ब्रायन लाराच्या ४०० धावांच्या विक्रमाला त्याने केव्हाच मागे टाकले असते कारण न्यूझीलंडचा कोणताही गोलंदाज त्याला त्या सामन्यात त्रास देऊ शकला नव्हता.

इंझमाम त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, “मला आठवते मी शेवटच्या फलंदाजाला सांगितले की तू थोडा वेळ थांबू शकशील का ? तेव्हा त्याच्या चेहर्‍यावरील भाव बरेच काही बोलले. त्याला आत्मविश्वासच नव्हता.”

“म्हणून मी मोठे शॉट्स खेळायचं ठरवलं आणि शेवटी मी बाउंड्री वरच बाद झालो. दुसर्‍या टोकाला माझा चांगला फलंदाज असता तर मी आणखी काही धावा करू शकलो असतो,” असे तो म्हणाला.

Inzamam-ul-Haq, Mark Boucher enlisted as Honorary Life Members of MCC
इंझमाम म्हणाला, “खरं सांगायचं तर हनीफ भाईचा रेकॉर्ड मोडण्याचा माझा हेतू नव्हता. जर हा विश्वविक्रम झाला असता तर वेगळी गोष्ट झाली असती, परंतु माझ्या सहकारी पाकिस्तानी खेळाडूचा विक्रम मोडणे मला कधीच आवडले नसते.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.