रांची : वृत्तसंस्था – कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे सध्या आयपीएलला स्थगिती देण्यात आली आहे. यानंतर सगळे खेळाडू आपापल्या घरी रवाना झाले आहेत. तेव्हा चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीदेखील आपल्या रांचीच्या घरी परतला आहे. धोनीचे चाहते नेहमी त्याला पाहायला उत्सुक असतात. धोनी सोशल मीडियापासून दूर असतो पण त्याची पत्नी साक्षी धोनी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. साक्षी नेहमी धोनीचे अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करते. साक्षीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतरचा धोनीता पहिला व्हिडीओ शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CPDCEE6HMXc/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो आपला बहुतेक वेळ रांचीमधील फार्म हाऊसमध्ये घालवत असतो. धोनी आपल्या फार्म हाऊसमध्ये शेती करून तो शेतीमधील उत्पादने बाजारपेठेत विकत असतो. धोनीचा हा व्हिडिओ रांची येथील फार्म हाऊसमधील आहे. या व्हिडीओमध्ये धोनी फार्म हाऊसमधील कुत्र्यांसोबत दिसत आहे. धोनीसोबत त्याची मुलगी जीवा देखील दिसत आहे. महेंद्रसिंह धोनीला विदेशी कुत्रे पाळण्याची हौस आहे. त्याच्या घरात अनेक विदेशी वंशाचे कुत्रे आहेत.
धोनीकडील सॅम या बेल्जियम वंशाच्या कुत्र्याची किंमत 75 हजार रुपये आहे तर लिली आणि गब्बर या कुत्र्यांची किंमत 60 ते 80 हजार रुपये आहे. या कुत्र्यांबरोबर धोनीकडे एक डच वंशाचा शेपर्ड कुत्रा देखील आहे त्याचे नाव झोया आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. चेन्नईने 7 पैकी 5 सामने जिंकत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी होती, मागच्या वर्षीच्या आयपीएलमध्ये चेन्नईला ‘प्ले ऑफ’ फेरी गाठण्यात अपयश आले होते. पण यंदाच्या आयपीएलमध्ये त्यांनी जबरदस्त पुनरागमन केले आहे.