अहमदाबाद : वृत्तसंस्था – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा धडाकेबाज फलंदाज एबी डीव्हिलियर्स याने विराट आणि रोहितला मागे टाकत आपल्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. एबी डीव्हिलियर्सने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळताना ४२ बॉलमध्ये नाबाद ७५ धावा केल्या आहेत. यामध्ये ३ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. त्याच्या या आक्रमक खेळीमुळे एबी डीव्हिलियर्सला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले. एबी डीव्हिलियर्सचा आयपीएल स्पर्धेतील २५ वा ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार आहे.
एबी डीव्हिलियर्स याने कालच्या खेळीनंतर ५ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. एबी डीव्हिलियर्स याने हि कामगिरी ३२८८ बॉलमध्ये केली आहे. या खेळीत ३ शतक व ४ अर्धशतकांचा समावेश आहे. एबी डीव्हिलियर्सने ५ हजार धावांचा टप्पा सर्वात कमी बॉलमध्ये पूर्ण केला आहे. या अगोदर हा रेकॉर्ड सनरायझर्स हैदराबादचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नर याच्या नावावर होता. वॉर्नरने ३५५५ बॉलमध्ये ५ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. एबी डीव्हिलियर्सने डेव्हिड वॉर्नरसोबत विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना यांनादेखील मागे टाकले आहे.
एबी डीव्हिलियर्सने आयपीएलची सुरुवात दिल्लीच्या संघाकडून केली होती. एबी डीव्हिलियर्सने आयपीएलचे पहिले ३ सिझन दिल्लीच्या संघाकडून खेळले आहेत. दिल्लीकडून खेळताना त्याने २८ सामन्यांत ६७१ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने आरसीबीकडून खेळताना ४३८२ धावा केल्या. आयपीएलमध्ये सर्वात जास्त रन करण्याचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने आयपीएलमध्ये ६ हजार धावांचा टप्पा पार केला आहे.