गुजरातचा Rashid Khan राजस्थानच्या ‘या’ 7 जणांवर पडत आहे भारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – अवघ्या काही तासांनंतर आयपीएल 2022 ची फायनल होणार आहे. या संपूर्ण सिझनमध्ये सातत्यपूर्ण खेळ केलेल्या गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या बलाढ्य संघांमध्ये हि फायनल होणार आहे. या फायनलमध्ये दोन्ही टीमच्या कौशल्याचा कस लागणार आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सला गुजरातच्या एका खेळाडूपासून सावध राहावं लागणार आहे. कारण तो एकटाच खेळाडू राजस्थान रॉयल्सच्या 7 जणांवर भारी पडत आहे. तो खेळाडू म्हणजे गुजरात टायटन्सचा व्हाईस कॅप्टन आणि अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खान (Rashid Khan) आहे. राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंना राशिद खान (Rashid Khan) विरुद्ध सावध खेळावे लागणार आहे.

राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंचा राशिद खान विरुद्धचा रेकॉर्ड
यशस्वी जैयस्वालनं राशिद (Rashid Khan) विरूद्ध 9 बॉलमध्ये 13 रन केले असून तो एकवेळा आऊट झाला आहे. या सिझनमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या जोस बटलरचा रेकॉर्ड तर आणखी खराब आहे. बटलरनं राशिद विरूद्ध 41 बॉलमध्ये फक्त 25 रन काढले असून त्यामध्ये तो 4 वेळा आऊट झाला आहे. विशेष म्हणजे बटलरला राशिद विरूद्ध आजवर एकही बाऊंड्री मारता आलेली नाही. राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसननं 77 बॉलमध्ये 73 रन केले असून या दरम्यान तो एकवेळा आऊट झालाय. देवदत्त पडिक्कलची 20 बॉलमध्ये 16 रन आणि 1 वेळा आऊट अशी कामगिरी आहे. शिमरॉन हेटमायरनं 45 बॉलमध्ये 63 रन काढले आहेत पण तो 4 वेळा आऊट झालाय. रियान पराग अजून राशिदला एकदाही आऊट झालेला नाही. पण त्यानं फक्त 7 बॉल खेळले असून त्यामध्ये 6 रन काढले आहेत. तर आर. अश्विननं 6 बॉलमध्ये 7 रन काढले असून त्यामध्ये तो 2 वेळा आऊट झाला आहे.

राशिद खानचा फायनल खेळण्याचा अनुभव
राशिद खाननं (Rashid Khan) आजवर टी20 लीगच्या 5 फायनल खेळल्या असून त्यामध्ये त्याला 2 विकेट्सच मिळाल्या आहेत. असे असले तरी त्याचा या सामन्यातील इकोनॉमी रेट हा फक्त 5.27 आहे. त्यामुळे आयपीएल फायनलमध्ये खेळताना राजस्थान रॉयल्सचा संघ दबावात असणार आहे. त्याचा फायदा गुजरातच्या अन्य बॉलर्सना होणार आहे. त्यामुळे आता राजस्थान रॉयल्सचा संघ राशिद खानची भेदक गोलंदाजी मोडून काढण्यात यशस्वी होते का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे पण वाचा :

दोन महिलांनी चोरल्या 90 हजारांच्या पैठण्या, चोरीची घटना CCTVमध्ये कैद

मृत पिल्लाला घेऊन हत्तीणीची फरफट, मन हेलावणारा व्हिडिओ आला समोर

कार चालकाच्या एका छोट्याशा चुकीमुळे महामार्गावर भीषण अपघात

नागपुरची कन्या संजना जोशी राष्ट्रकुल स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्त्व, कोण आहे संजना जोशी ?

जिथे राष्ट्रवादी स्ट्राॅंग तिथे शिवसेनेवर अन्याय : खा. श्रीकांत शिंदे

Leave a Comment