वीरेंद्र सेहवागचं मोठं विधान; धोनी कर्णधार असता तर बुमराहला सुपरओव्हर दिलीचं नसती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । न्यूझीलंडविरुद्ध तिसर्‍या टी-२० सामना जरी भारताने जिंकला असला तरी या सामन्यात घेतलेल्या निर्णयावर उलट-सुलट चर्चा होत आहेत. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतील निर्णायकी तिसरा टी-२० सामना सुपर ओव्हरमध्ये पोहचला. यावेळी कर्णधार विराट कोहलीनं चेंडू आपला विश्वासू गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याकडे दिला.

मात्र, सुपरओव्हरमध्ये जसप्रीत महागात पडला. बुमराच्या त्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांनी तब्बल १७ धावा कुटल्या. या धावांमुळं न्यूझीलंडने भारतापुढं १८ धावांचे आवाहनात्मक लक्ष्य समोर ठेवलं. या लक्ष्याला गाठण्यासाठी एकावेळी करताना २ चेंडू १० धावा भारताला हव्या होत्या. प्रचंड उत्कंठा वाढविणाऱ्या या सामन्यात ऐनवेळी रोहित शर्माने तडाखेबाज सलग २ षटकार लगावत भारताला विजय मिळवून दिला.

मात्र, जसप्रीत बुमराहला सुपरओव्हर देण्याच्या निर्णयावर सामन्यानंतर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने एका वहिनीला दिलेल्या मुलाखतीत यांवर भाष्य करत म्हटलं,” जर हॅमिल्टन टी-२० सामन्यामध्ये एम.एस धोनी (एमएस धोनी) कर्णधार असता तर त्यानं जसप्रीत बुमराहला कधीही सुपर ओव्हर दिली नसती. कारण त्या दिवशी उजवा हाताने वेगवान गोलंदाजी करणारा बुमराह फॉर्ममध्ये नव्हता. सेहवागच्या म्हणण्यानुसार धोनीने जसप्रीत बुमराहऐवजी रवींद्र जडेजाला गोलंदाजी दिली असती.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

जय श्रीराम, वंदे मातरम अशा घोषणा देत युवकाचा निदर्शकांवर गोळीबार; पोलीस बघ्याच्या भूमिकेत

वाढत्या वजनामुळं फडणवीसांनी टाळला रबडी, कुल्फीचा मोह; नेमका काय आहे किस्सा

जामिया विद्यापीठाजवळ अज्ञात माथेफिरू युवकाकडून मोर्चेकऱ्यांवर गोळीबार; विद्यार्थी जखमी